डोंबिवली : आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने तयारी करतोय, आयत्यावेळी घेाटाळा नको म्हणून प्रत्येक प्रभागात आपली ताकद आजमावयला प्रत्येक पक्षाची तयारी सुरू आहे. आम्ही देखील करतेाय.. अस सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले. 

कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आव्हाड डोंबिवलीत आले होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले की,  सहा​-​ आठ महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील​,​ त्यामुळे जनतेपर्यंत जायला पाहिजे ​काल​ भिवंडीला गेलो होतो,​ ​गेल्या पाच​-​ दहा वर्षात असा प्रतिसाद मिळाला नव्हता,​ तो भिवंडीत मिळाला. ​आज डोंबिवलीत आलो ,डोंबिवलीचा अनुभव काही चांगला नव्हता​.​ म्हणून डोंबिवलीत यायला टाळायचो,​ ​डोंबिवलीत राष्ट्रवादीची ताक​​द नव्हती​,​ मात्र​ आज कार्यकर्त्यांची गर्दी​ पाहून समाधान वाटलं​. सत्तेचा प्रमुख कोण आहे ? या प्रश्नावर​ बोलताना​ आ​व्हाड ​ यांनी आघाडी सरकार​ जरी असलं तरी  सर्वात जास्त आमदार शिवसेनेचे असल्याचं सांगितलं​. ​​ ​जावेद अखतर यांनी केलेल्या विधनाबाबत प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य दिलंय त्यामुळे जावेद अखतर बोलले याबाबत काही आश्चर्य वाटल नसल्याचं सांगितलं. कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, जिल्हा सरचिटणीस रोहित सामंत, डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुरेश जोशी, कार्याध्यक्ष नंदु धुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *