ऐन उन्हाळ्यात पडघे गावातील विहीर झाली स्वच्छ !
पडघे : पडघे गावातील प्रभाग क २ मध्ये आज साफ सफाई मोहीम राबविण्यात आली. यावेळी पडघे गावातील विहीर स्वच्छ करण्यात आली. ऐन उन्हाळ्यात विहिरीतील पाण्याचा वापर नागरिकांना करता येणार आहे. ऐन उन्हाच्या दिवसात विहीर स्वच्छ झाल्याने गावातील महिला व नागरिकांनी मान्यवरांचे  आभार मानले.
  
गेल्या अनेक दिवसांपासून विहिरीत कचरा पडला होता. कचऱ्यामुळे पाणी दूषित झाले होते. शेकापचे नगरसेवक विष्णू जोशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक रायगड जिल्हा उपाध्यक्ष राहुल कांबळे यांच्या पुढाकाराने आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विहिरीत पडलेला सर्व कचरा काढून,  विहीर स्वच्छ करण्यात आली. तसेच विहिरी शेजारी असलेल्या नाल्यांची साफ सफाई करण्यात आली. यावेळी दीपक कांबळे, उशाला जाधव, अमोल सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *