राष्ट्रवादीचा रेल रोको दोन मिनीटात संपला
ठाणे : एलफिन्स्टन दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी सकाळी कळवा येथे केलेला रेल रोको पोलिसांमुळे अवघ्या दोन मिनिटातच संपल्याने चाकरमण्यांचा खोळंबा टळला.
सकाळी सव्वानऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रेल रोको करण्यात आला. पण पोलिसांनी त्यांना तात्काळ रुळांवरुन बाजूला हटवलं. लोकल रोखल्या गेल्यास लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन दोन मिनीटात आंदोलन संपवले. आव्हाडांनी रेलरोको करुन लोकांना त्रास देऊ नये असे मेसेज सोशल मीडियावर आणि रेल्वे सुरक्षा संघानेही व्यक्त केली होती. एकही लोकल थांबून राहिली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
