नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांची महसूल मंत्रयानी घेतली दखल :
येत्या दोन दिवसात मंत्रालयात बैठकीचे आयोजन
नवी मुंबई : सिडकोकडून झालेल्या अन्यायाविरोधात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांचे गेल्या २२ दिवसांपासून ठियया आंदोलन सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे सरकारी यंत्रणेकडून कानाडोळा केल्याने त्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव व आगरी कोळी भूमिपूत्र महासंघाचे नेते संतोष केणे यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे साकडं घातलं आहे. अखेर महसूल मंत्रयांनी या उपोषणाची दखल घेतली असून येत्या दोन दिवसात प्रकल्पग्रस्त बाधितांसोबत मंत्रालयात बैठक आयेाजित करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत
२३ डिसेंबर २०१९ पासून शेकडो प्रकल्पग्रस्त सिडको कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलनाला बसले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सचिव व आगरी कोळी भूमिपूत्र महासंघाचे नेते संतोष केणे यांनी दोनवेळा प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. सिडकोने महसूल विभागाशी संगमनत करून प्रकल्पग्रस्तांकडून संमतीपत्र घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे तसेच सिडकोने जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणी केली नाही तसेच त्या प्रकल्पग्रस्तांकडे स्वत:चे घर नसल्याने त्यांना राहण्यासाठी दुसरा पर्याय नाही त्यामुळे शेकडो प्रकल्पग्रस्तांनी न्यायासाठी ठियया आंदोलनाला बसले आहेत मात्र प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे सरकारी यंत्रणेकडून कानाडोळा केल्याने त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी व त्यांना न्याय मिळावा यासाठी बैठकीचे आयेाजन करण्यात यावे अशीही मागणी केणे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. त्या मागणीची महसूल मंत्रयानी तातडीने दखल घेत बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे गेल्या २२ दिवसांपासून आम्ही शेकडो बाधित उपोषणाला बसलो आहोत मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही मात्र संतोष केणे साहेब यांनी आमच्या उपोषणाची दखल घेत आमची समस्या महसूल मंत्रयापर्यंत पोहचवली. महसूल मंत्रयांनाकडूनही मंत्रालयात बैठकीचे लेखी आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि संतोष केणे यांचे शेकडेा बाधितांनी आभार मानले.