नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली गावातील आदिशक्ती नगर येथील अंकल स्मृती अपार्टमेंट या पाच मजली इमारतीला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत इमारतीच्या पहिल्या , दुसऱ्या मजल्यांवरील फ्लॅटचं मोठं नुकसान झालं आहे. यात तळमजल्यावर पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. या इमारतीच्या शेजाऱ्यांनी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतकार्यामुळे आग नियंत्रणात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमन दलानं स्पष्ट केलं. काही समाजकंटकानी हे कृत्य जाणीवपूर्वक केले असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

   आज पहाटे 3 वाजून 15  मिनिटांनी इमारतीच्या तळमजल्यावर मोटारसायकल पार्कींग च्या ठिकाणी  अचानक आग लागली. या आगीची झळ पहिल्या मजल्यावर राहत असलेल्या समाजसेवक गणेश सकपाळ यांच्या प्लॅट ने  पेट घेतल्याने दुसऱ्या मजल्यावर आगीचे तांडव झाले होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत आगीची झळ पोहोचली. दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये अग्नितांडव निर्माण झाल्याने साखर झोपेत असणारे फ्लॅटमधील रहिवाशी खडबडून जागे झाले आणि त्यांची एकच धावपळ उडाली. आगीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकलेले नाही . त्यामुळे आग लागली की लावली असा संशय रहिवाशी व्यक्त करीत आहेत.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!