नवी मुंबई : नवी मुंबई विमान तळाला दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडत आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचा गंभीर इशारा पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला. दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती तर्फे डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात विमानतळ नामकरण परीषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समिती तर्फे डोंबिवली येथील प्रगती महाविद्यालयाच्या सभागृहात विमानतळ नामकरण परीषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी जगदीश गायकवाड बोलत होते अनेक दिवस नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी आगरी समाजाकडून केली जात असून या मागणीला इतर समाजाने आणि अनेक राजकीय पक्षांनी देखील पाठींबा दिला आहे. मात्र तरीही या विमानतळाला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही आहे.
आपल्या या मागणीसाठी 29 जुलैपूर्वी पारंपरिक वेशात दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत हवाई उड्डामंत्र्याची भेट घेणार आहोत .त्यानंतर ही हा प्रश्न मार्गी न लागल्यास दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडत आपली मागणी मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिथे न्याय मिळाला नाही आणि त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय बदलला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर घेराव घालत त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे.