डोंबिवली : पोलीस म्हटलं की बारा, अठरा तासाची डयुटी, रोजची दगदग, ताणतणाव अशावेळी त्यांना आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे पोलिसांमध्ये आजारपण वाढत जाते. त्यामुळेच पोलिसांच्या आजारपणाच्या समस्या सोडविण्यासाठी डोंबिवली पोलीस ठाण्यात निसर्गोपचार आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा पोलीसांना लाभ घेतला.
डोंबिवली येथील हिरण्मयी निसर्गोपचार केंद्राच्या वतीने संचालिका तसेच निसर्गोपचार तज्ज्ञ पूर्णिमा प्रभाकर हंकारे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. विविध शारीरिक समस्यांनी ग्रासलेल्या पोलीसांना निसर्गोपचार उपचारांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला. दिवसभर सुरू असलेल्या शिबीराचा रामनगर पोलीस स्थानकातील कार्यरत असलेल्या जवळपास २० ते २५ महिला व पुरुष पोलीसांनी याचा लाभ घेतला. हिरण्मयी निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका पूर्णिमा प्रभाकर हंकारे यांनी रामनगर पोलीस स्थानकात निसर्गोपचार शिबीर आयोजित केल्याप्रकरणी रामनगर पोलीसांनी त्यांचे आभार मानले. निसर्गोपचार शिबीरासाठी संपर्क साधण्यासाठी मो ९७०२८९४८४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.