कल्याण येथे ३५०० हजार विद्यार्थ्‍यांनी घातला सूर्यनमस्कार 
कल्याण :  – कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका आणि कल्याण येथीलसुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज कल्‍याण येथील सुभाष मैदानावर राष्‍ट्रीय सूर्यनमस्‍कार दिनानिमित्‍त सुर्यनमस्‍काराचा कार्यक्रम साजरा करण्‍यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्‍हणून जिल्‍हयाचे जिल्‍हाधिकारी डॉ. महेंद्र कल्‍याणकर हे उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील २० शाळांमधील सुमारे ३५०० हजार विद्यार्थ्‍यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला.
याप्रसंगी जिल्‍हाधिकारी डॉ. कल्‍याणकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सूर्यनमस्‍कार हा सर्वांगसुंदर असा हा व्‍यायामाचा प्रकार असून विद्यार्थ्‍यांनी त्‍याचा अंगीकार करावा असे सांगीतले.  तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी सुर्यनमस्‍कार केल्‍यामुळे शरिर सुदृढ होवून सहनशिलता वाढण्‍यास मदत होते. उपस्थित विद्यार्थ्‍यांना कल्‍याणचे योग प्रशिक्षक सुधाकर दिवेकर यांनी सुर्यनमस्‍काराचे १२ प्रकारचे प्रात्‍यक्षिक विद्यार्थ्‍यांमार्फत करुन घेवून त्‍यांना योगाचे महत्‍व देखील पटवून दिले. याप्रसंगी कल्‍याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर मोरेश्‍वर भोईर,स्‍थायी समिती सभापती राहूल दामले , उपविभागीय अधिकारी प्रसाद उकिर्डे उपस्थित होते. उपस्थित मान्‍यवरांचा सत्‍कार सुभेदारवाडा कट्टयाचे अध्‍यक्ष दिपक जोशी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *