ठाणे : ठाणे जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार व इतर न्यायालयांमध्ये शनिवार दि. 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश ठाणे तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेदहा वाजता ही राष्ट्रीय लोक अदालत होईल, असे प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, 138 एन. आय. ॲक्ट (चेक संबंधिची) अन्वये दाखल झालेली प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अ़पघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन प्रकरणे, वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे, महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

तसेच दाखल पूर्व प्रकरणाबाबत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा. राष्ट्रीय लोक अदालती बाबत चौकशीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क साधावा : वाशी (नवी मुंबई, जिल्हा ठाणे) – 022-27580082, भिवंडी – 02522-250828, कल्याण – 0251-2205770, मुरबाड – 02524-222433, शहापूर – 02527-270776, उहासनगर- 0251-2560388, पालघर- 02525-256754, वसई – 0250-2325485, वाडा – 02526-272672, डहाणू – 02528-222160, जव्हार 02520-222565.असे आहेत.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्याय सेवा सदन, पहिला मजला, जिल्हा न्यायालय परिसर, ठाणे येथे प्रत्यक्ष येवून किंवा फोन नंबर 022- 25476441 वर संपर्क करावा. सर्व पक्षकारांनी प्रंलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडविण्याकरिता व आपले दुरावलेले संबंध पुर्नस्थापीत करण्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचा अवश्‍यक लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!