मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाभिक संघटनेचे आंदोलन 

भिवंडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमात भाषण करताना विरोधी काँग्रेस ,राष्ट्रवादी पक्षाला चिमटे काढताना नाभिक समाजाच्या विरोधात अपशब्द काढून हेटाळणी केली.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजाकडून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात असून शनिवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली नझराना ,शिवाजी चौक येथे नाभिकांनी रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शन करून आंदोलन केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात नाभिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मयूर जाधव ,शहर अध्यक्ष सुरेश समुद्राल ,उपाध्यक्ष प्रकाश झंपाल ,गणेश खंडागळे ,इरफान सलमानी ,अमोल भोईर ,बळीराम भोईर ,ग्रा.पं.सदस्य प्रशांत गायकवाड, राजेंद्र जाधव ,प्रशांत साने आदींसह शहर व ग्रामीण भागातील नाभिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!