नाशिक महापालिकेच्या महासभेत राडा
नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. महापौरांच्या आसनासमोर उभे राहून त्यांना घेराव घालून, राजदंड पळविण्याचा प्रयत्न झाला.
आमच्या तक्रारींची दखल घेतली जात नसून इतिवृतात सत्ताधारी नगरसेवकांच्या एकाच प्रभागात २० ग्रीन जिमला मंजूरी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड खेचण्यास सुरुवात केली. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सहभागी झाले होते. गोंधळ वाढल्याने महापौर रंजना भानसी यांनी राष्ट्रगीताला सुरुवात करून सभा आवरली.
सभागृहात चर्चा करण्यापेक्षा गोंधळ घालण्याकडे सदस्यांचा जास्त कल असतो आणि असंच वागण्याचा जणू पायंडा पडला आहे. बहुतेक नगरसेवकांना समस्या,विकास,प्रकल्प यांचा संबंध फक्त टक्केवारीसाठी च असतो एवढंच समजत असल्याने ,सभागृहात अभ्यासपूर्ण व्यक्त होण्यापेक्षा असं गोंधळ घालणं त्यांना अधिक सोयीचं वाटतं…
राजदंड पळवण हा मानअपमानाचा एक मोठा खेळच खेळला जातो. राजदंड पळवल्याने खरंच महापौरांचा अपमान होतो का ? आणि जर महापौरांचा अपमान होत असेल तर सभागृहातील गोंधळ थांबवण्यासाठी म्हणून जर राष्ट्रगीत गाणं हा उपाय करत असतील तर तो राष्ट्रगीताचा अपमान नाही का ?