मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज्यात शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी युवा सेनेच्या वतीने आंदोलन केली जात आहे. त्यामुळे राणे विरूध्द शिवसेना असा सामना रंगला आहे. दरम्यान नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. मात्र केंद्रीय मंत्रयाना अटक करता येत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांकडून दिली जात आहे. त्यामुळे राणेंना अटक होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे या यात्रेदरम्यान राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. या वक्तव्यामुळे राज्यात शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे सामाजिक तेढ निर्माण होऊन् कायदा व शांतता बाधित होईल असे चिथावणी देणारे वक्तव्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान नाशिकमध्ये युवा सेनेच्या कार्यकत्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. तर चिपळूणमध्ये शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याने वातावरण गंभीर बनले, तर मुंबईतील जहू येथील राणेंच्या निवासस्थानाजवळ शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. त्यामुळे राणे विरूध्द शिवसेना असा वाद चांगलाच उफाळून आला आहे.
काय आहे पोलिस आयुक्तांचे आदेश
नाशिक सायबर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात कलम 500, 505 (2),153 ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी सांगितले. मुख्यमंत्रयाबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. सदर गुन्हयातील आरोपी नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यामुळे अटक केल्यानंतर उपराष्ट्रपतींना कळवलं जावं अटकेची माहिती भारत सरकारला द्यावी कारवाईवेळी राजशिष्टाचाराचं पालन करा हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावे असे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही : नारायण राणे
माझयावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही असे केंद्रीय मंत्री राणे यांनी म्हटलं आहे. मी काय साधा माणसू वाटलो का ? असा सवालही राणे यांनी उपस्थित केला. शिवसैनिकांना मी भीक घालत नाही असेही राणे म्हणाले.