भाजपच्या घोडदौडीला नांदेडमध्ये लगाम
अशोक चव्हाणांचा करिष्मा कायम
नांदेड : राज्यात भाजपची लाट सुरू असतानाच नांदेड- वाघाळा महानगरपालिकेवर पून्हा एकदा काँग्रेसने आपला झेंडा फडकवल्याने भाजपच्या घोडदौडीला लगाम बसला आहे. त्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी ८१ पैकी ७१ जागा जिंकून आपला करिष्मा कायम ठेवला आहे.
राज्याचं लक्ष वेधलेल्या नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल गुरूवारी लागला. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. नांदेडची महापालिका काबीत करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जाहिर सभा घेतल्या होत्या तर मंत्रयाचा लवाजमा नांदेडमध्ये दाखल झाला होता. मात्र नांदेडवासियांनी भाजपला सपशेल नाकारले.  आतापर्यंत जाहिर झालेल्या निकालात काँग्रेसने ७१ भाजप ५ शिवसेना १ इतर ४ तर एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भेापळा मिळाला आहे. काँग्रेसने एक हाती सत्ता काबीज केली आहे. निवडणुक प्रचाराच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेस लोणच्याला उरली नसल्याची टीका करीत शिवसेना ही अशोक चव्हाणांची बी टीम असल्याचा हल्लाबोल केला होता. शिवसेनेला दोन अंकी जागा मिळणार नसल्याची टीकाही मुख्यमंत्रयानी केली होती. मात्र नांदेडची सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणा-या भाजपलाच दोन अंकी जागा पटकावता आलेल्या नाही. या निवडणुकीत ५७८ उमेदवार रिंगणात होते. नांदेडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आल्या होत्या. एकूण ३७ मशीन होत्या. त्यातील ६ बंद झाल्याने नेहमीच्या इव्हीएमवर मतदान घेण्यात आले.
भाजपचा परतीचा पाऊस : अशोक चव्हाण
नांदेडमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण केलं पण जे पक्ष बदलून भाजपमध्ये गेले ते सर्वजण पराभूत झाले नांदेडकरांनी भाजपच्या खोटया प्रचाराला नाकारले. नांदेडमधून काँग्रेसच्या विजयाची सुरूवात झाली असून भाजपच्या परतीचा प्रवास सुरू झालाय असे खासदार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सोशल मीडियाचा वापर आवश्यक होता. पण, त्यांचा भाजपने गैरवापर केला. त्याचा धसका आता भाजप घेत आहे असेही चव्हाण म्हणाले. नांदेडमध्ये मिळालेला विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे. हा विजय पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना अर्पण केला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भाजप-सेनेला आत्मपरिक्षणाचा राणेंचा सल्ला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका करणारे नारायण राणे यांनी नांदेडमधील विजयाबद्दल चव्हाण यांचे अभिनंदन केलय. नांदेडच्या पराभवाचं भाजप व शिवसेनेला आत्मपरिक्षण करावे असा सल्ला राणे यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!