मुंबई : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, गोरेगाव मुंबई स्थित “वेस्टीन या पंचतारांकित” हॉटेलमध्ये, *स्वातंत्र्याची पंचाहत्तरी* या साहित्य संग्रहाचे नंदा फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार, इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनचे कार्यकारी संपादक एन. डी. खान आणि संपादक श्री.विलास देवळेकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. या संग्रहात प्रसिद्ध झालेल्या सुनील म्हसकर यांच्या *’करु या स्मरण क्रांतिवीरांचे’* या स्वरचित राष्ट्रभक्तीपर कवितेसाठी *”नंदा इनोव्हेटिव्ह काव्य सन्मान”* जाहीर झाला आहे.
सुनील म्हसकर हे ‘विश्व मराठी साहित्य परिषदेचे’ आजीव सभासद असून ते ‘शारदासुत’ या टोपणनावाने साहित्य लेखन करत असतात. त्यांना काव्यलेखन, कथा व नाट्यलेखनासाठी याआधी अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. सुनील म्हसकर हे स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून सध्या ते ठाणे येथील श्रीरंग एज्युकेशन सोसायटीच्या श्रीरंग विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या साहित्य लेखनातील कौतुकास्पद कामगिरीबाबत त्यांचे सर्वच क्षेत्रातील मंडळीकडून अभिनंदन होत आहे.
आपण माझ्या साहित्यिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबतची खूपच छान बातमी लावली आहे! त्याबद्दल आपल्या समूहाचे आणि संपादक मंडळ व पत्रकार बंधू यांचे खूप खूप धन्यवाद! आपला दिवस आनंदाचा व सुखाचा जावो! 🙏🌹🙂🙂🌹🙏