सारेगमपचा महाविजेता नचिकेत लेले वर कल्याणकरांकडून कौतूकाचा वर्षाव
कल्याण : कल्याणचा नचिकेत लेले सारेगमप स्पर्धेचा महाविजेता ठरलाय तर दिग्रसचा उज्जवला हा उपविजेता ठरलाय. विजेत्या नचिकेतला ५ लाख रुपये इतकं बक्षीस आणि झी मराठीच्या एका मालिकेचे शिर्षक गीत गाण्याची संधी मिळणार आहे अभिनेता अक्षय कुमार, अन्नू कपूर आणि सोनम कपूर यांच्या खास उपस्थितीत महाअंतिम सोहळा रंगला होता. नचिकेतवर कल्याणकरांकडून कौतूकाचा वर्षाव होत आहे.
झी मराठी वाहिनीवरील सारेगमप या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या स्पर्धकांचा सामना रंगला होता. महाअंतिम फेरीत ३६ पैकी १२ स्पर्धक दाखल झाले होते. त्यातून कल्याणचा नचिकेत, दिग्रसचा (जि. यवतमाळ) उज्ज्वल गझधर आणि पुण्याचा अक्षय घाणेकर हे अंतिम तीन स्पर्धक महाविजेतेपदाच्या शर्यतीत राहीले. त्यातून उज्ज्वल आणि अक्षयवर मात करत नचिकेतने महाविजेतेपदावर आपले नाव कोरले. दिग्रसचा उज्ज्वल उपविजेता ठरला. उज्ज्वलला ३ लाख रुपये आणि एका मालिकेचे शिर्षक गीत गाण्याची संधी दिली जाणार आहे.