भ्रष्टाचार मुक्त भारतसाठी नाबार्डची जनजागृती
घाटकोपर : भ्रष्टाचार मुक्त भारत असा नारा देत नाबार्डच्यावतीने आज जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी संस्थेच्या 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. शासनाच्या सेंट्रल विजिलान्स कमिशन द्वारे जागरूकता कार्यक्रमाच्या अंतर्गत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. चीफ विजिलन्स ऑफिसर अनंत उपाध्याय त्यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आले. यावेळी बोलताना उपाध्याय म्हणाले की, प्रामाणिकपणा आणि एकात्मतेसाठी वचनबध्दता हेच नाबार्डचे मुख्य उद्दीष्ट आहे. वॉकेथॉनबद्दल अतिशय आनंद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल. नाबार्डने १० राज्यातील २२ जिल्हयांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सार्वजनिक जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी दिली हेाती शाळा कॉलेज इतर संस्थामध्ये जागरूकता कार्यक्रम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मध्ये रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, न्यूक्लिअर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि , बॅंक ऑफ बडोदा यांचा अंतभाव करत 14 इतर वित्त संस्था वीजिलन्स स्टडी सर्कल बॅनरखाली यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
( फोटो : सुरेश ढेरे )