मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांची सांगितीक मैफिल आणि सुप्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांचे निरुपण …….
डोंबिवली : तबला पखवाजचा ठेका त्याच्या जोडीला टाळ आणि मृदुंग आणि मंत्रमुग्ध करणारे सूर यांचा सुरेल संगम डोंबिवलीकर मधुमालती एंटरप्रायझेस आणि रघुलीला एंटरप्रायझेस या संस्थांच्यावतीने आयोजित आनंदवारी …. अभंगवारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवणार आहेत. हा कार्यक्रम दिनांक ९ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे.
सारेगमच्या माध्यमातून घराघरात पोचलेल्या मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचे सादरीकरण असलेल्या या आनंदवारीत अभंग , भक्तिगीते , भारुड यांसारखे विविध गीत प्रकार या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत. त्याचबरोबर लिटिल चॅम्प पर्वातील उपविजेती ठरलेली स्वरा जोशी हिचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे.
विठ्ठल रखुमाईचे नाते , वारकरी परंपरा , महाराष्ट्रातील संत परंपरा याची अनुभूती सुप्रसिद्ध निवेदिका , व्याख्यात्या धनश्री लेले यांच्या निरूपणातून रसिकांना घेता येणार आहे . प्रदीर्घ काळानंतर डोंबिवलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून अधिकाधिक रसिकांनी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन मधुमालती एंटरप्रायझेसच्या संदीप वैद्य आणि रघूलीला एन्टरप्रायझेसच्या आदित्य बिवलकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील कडोंमपा बुकिंग ऑफिस येथे उपलब्ध आहेत. ९८२०९५७५९९ या क्रमांकावर फोन बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे.