कल्याण : कल्याणात ७० वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच डोंबिवलीत लोढा हेवन परिसरात 30 वर्षीय महिलेची गळा चिरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडलीय .लागोपाठ घडलेल्या या घटनामुळे शहरात  खळबळ उडाली आहे .श्वेता गुप्ता असं मयत महिलेचं नाव आहे .
श्वेता गुप्ता आणि तिचा पती राजेश हे दोघे डोंबिवली लोढा हेवन भवानी चौक परिसरात भाडे तत्वावर रेशनिंगचं दुकान चालवत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास याच दुकानाच्या मागील बाजूस राजेश गुप्ता त्याची पत्नी श्वेता गुप्ता व त्यांचा कामगार गुडडी कुमार दारू पीत बसले होते.यावेळी  त्यांच्यामध्ये  आकस्मिक कारणांवरून वाद  झाला आणि त्याचे पर्यावासान हत्येत घडल्याचे पोलिसांनी  सांगितले. दरम्यान  राजेश यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी संशयच्या आधारे गुडडीकुमारला ताब्यात घेत  चौकशी सुरू केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!