मुंबईकरांची  पसंती ऑनलाइन सेवेला ! ७४ हजारांची संख्या पोहचली ४ लाखावर : ९७ टक्के भरणा ही ऑनलाइन 

मुंबई : महापालिकेद्वारे देण्यात येणाया विविध नागरी सेवा सुविधाशी संबंधित अर्जनोंदणीनूतनीकरण इत्यादींसाठी नागरिकांच्या महापालिकेतील फेया कमी होण्याच्या उद्देशाने पालिकेने ऑनलाईन‘ प्रक्रिया केलीय. पालिकेच्याऑनलाइन सेवेला मुंबईकरांची चांगलीच पसंती मिळालीय. मागील वर्षी केवळ ७४ हजार ५११ अर्जदारांनी ऑनलाईन‘ पद्धतीने अर्ज केले होतेया संख्येत यावर्षी म्हणजेच १ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ४५१ टक्यांची वाढ होऊन ही संख्या आता ४ लाख १० हजार ५२५ वर पोहचली आहेविशेष म्हणजे सेवा सुविधांपोटी महापालिकेला प्राप्त होणाया एकूण शुल्कापैकी तब्बल ९७ टक्के शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने तर केवळ ३ टक्के शुल्क हे जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहेजुन्या पद्धतीने (ऑफलाईनपद्धतीने अर्ज करणायांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.  गेल्यावर्षीच्या ५ लाख ३ हजार ८३७ च्या तुलनेत या वर्षी २५ हजार ८६ झाली आहे

मनपाद्वारे नागरिकांना देण्यात येणाया नागरी सेवा सुविधांविषयीची कार्यवाही अधिक गतिमान व अधिकाधिक पारदर्शक होण्याच्या उद्देशाने ऑनलाईन‘ प्रशासकीय प्रक्रिया करण्यावर महापालिका प्रशासनाचा भर आहेयावर्षी २८ सेवा सुविधांशी संबंधित प्रक्रिया आतापर्यंत ऑनलाईन करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने शॉप लायसन्सविवाह नोंदणीचर खोदणेआरोग्य परवानेव्यवसाय परवाने,जाहिरात अनुज्ञाप्तीनवीन कारखाना परवानाजल जोडणीअग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्रशिक्षण खात्याशी संबंधित अर्जविषयक पाण्याचा टँकर,  मृत्यु प्रमाणपत्र,  नवरात्री व गणेशोत्सव संबंधी परवानग्याचित्रीकरण परवानग्या इत्यादी बाबींचा समावेश आहेया सुविधा महापालिकेच्या www.mcgm.gov.in /portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेतयाच सेवा महापालिकेच्या ‘MCGM 24 x 7’ या भ्रमणध्वनी ऍपच्या माध्यमातून देखील यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

 कशी आहे अर्जाची संख्या..

१ एप्रिल २०१७ ते २८ फेब्रुवारी २०१८ या अकरा महिन्याच्या कालावधीत सर्वाधिक म्हणजे २ लाख १२ हजार ३२३ ऑनलाईन अर्ज हे दुकान परवान्याच्या नूतनीकरणासाठी असणाया शॉप फॉर्म– बी‘ अंतर्गत प्राप्त झाले आहेततर याच कारणासाठी ऑफलाईन अर्ज करणायांची संख्या ३९ एवढी आहेयाखालोखाल नवीन दुकानाच्या नोंदणीसाठी असणाया शॉप फॉर्म – ए‘ करिता १ लाख १२ हजार ४८९ ऑनलाईन अर्जतर याच कारणासाठी केवळ एक ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला आहेविवाह नोंदणीसाठी ४९ हजार ६४९ ऑनलाईन अर्जविशेष म्हणजे यासाठी एकही ऑफलाईन अर्ज प्राप्त झाला नाहीदुकानाच्या किंवा दुकान मालकाच्या नावात बदल करण्यासाठी असलेल्या शॉप फॉर्म – इ‘ करिता २९ हजार १७७ ऑनलाईन अर्जतर याच कारणासाठी ७८ अर्ज जुन्या पद्धतीने प्राप्त झाले आहेतचर खोदण्यासाठीचे सर्वच अर्ज ऑनलाईनच स्वीकारले जातातयानुसार ३ हजार ८३१ अर्ज प्राप्त झाले आहेतत्याचबरोबर आरोग्य परवानेव्यापार परवानेकारखाना परवानावॉटर टँकरहोर्डिंग लायसन्स,जाहीरात परवानाश्वान परवाना इत्यादी बाबींसाठी देखील मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत

——-

One thought on “मुंबईकरांची  पसंती ऑनलाइन सेवेला ! ७४ हजारांची संख्या पोहचली ४ लाखावर : ९७ टक्के भरणा ही ऑनलाइन ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!