मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आता मुंबईला अर्थात महाराष्ट्राला जागतिक आर्थिक राजधानी बनवण्याचा आमचे लक्ष्य आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोरेगावातील नेस्को प्रदर्शन केंद्रात ते बोलत होते. यावेळी मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मला महाराष्ट्र आणि मुंबईतील 30 हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्धघाटन आणि पायाभरणी करण्याची संधी मिळाली. या योजनेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. 76 हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्टमधून 10 हजार पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. मोदी म्हणाले की, महाराष्ट्राकडे सशक्त वर्तमान, समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. महाराष्ट्र असे राज्य आहे की, ज्याचा विकसीत भारतात मोठा वाटा आहे. महाराष्ट्रात उद्योग आहे. दुनियाची सर्वात मोठी आर्थिक केंद्र मुंबई बनवण्याचे आमचे स्वप्न आहे. महाराष्ट्र टुरिझममध्ये दुनियातील नंबर एक राज्य बनले पाहिजे, येथे सह्याद्रीच्या डोगंरकड्यावर रोमांच आहे. येथे छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, असेही ते म्हणाले.
पालखी मार्गाचे काम देखील गतीने
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग दोनशे किमी पूर्ण झाले आहे. तर संत तुकाराम महाराजांची पालखी महामार्ग देखील लवकरच पूर्ण होऊन भाविकांसाठी लाभदायी होणार आहे. दळणवळणच्या माध्यमातून राज्याची प्रगती होते, महिलांना चांगल्या सुविधा मिळतात. एनडीए सरकार हे युवा, गरीब, शेतकरी, महिलांच्या विकासासाठी काम करत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकार देखील चांगले काम करत आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून 9 लाख कोटी युवकांना फायदा झाला आहे.
खोटे नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना चपराक
मोदी म्हणाले की, कौशल्य विकास आणि रोजगार हे महत्त्वाचे आहे. आरबीआयने एक रिपोर्ट जाहीर केला त्यात गेल्या तीन वर्षात 8 कोटी रोजगार उपलब्ध झाले. यामुळे खोटे नरेटिव्ह करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. यांची प्रत्येक रणनीती ही देशाच्या समोर पुढे येत आहे, यांची पोलखोल होऊ लागली आहे. रेल्वे, रेल्वे ट्रक, पुल बनतो त्यातून कोणााला कोणाला तरी रोजगार मिळतोच. पायाभूत सुविधांचा विकास होत असेल तर त्यातून लोकांना देखील रोजगार मिळतो.
समृद्धी हाच विकासाचा मार्ग
मोदी पुढे बोलताना म्हणाले की, सद्भाव व समृद्धी हाच विकासाचा मार्ग आहे. देशभरात 90 लाख युवकांना स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. तर त्यात महाराष्ट्रातील 13 लाख युवकांना त्याचा फायदा झाला आहे. देशात रेल्वेचा जो कायाकल्प होत आहे. त्यात महाराष्ट्रातील रेल्वेला देखील मोठा फायदा झाला आहे. यात 24 कोच असलेली ट्रेन देखील या ठिकाणी धावणार आहे. नॅशनल हायवेची लांबी ही गेल्या तीन वर्षात तिन पट वाढल्याचे देखील मोदी यांनी सांगितले.