*अंडर पास भुयारी ब्रीज अपूर्ण, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

ठाणे (अविनाश उबाळे) : मुंबई नाशिक आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील खडवली फाट्याजवळ एका प्रवासी जिपला झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुरक्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पडघा ते वासिंद दरम्यान अंडरपास भुयारी ब्रिजची कामे अपूर्ण ठेवल्याने महामार्गावर रस्ता ओलांडताना वाहनांना रोज लहान मोठे अपघात होत आहेत या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असून मुंबई नाशिक महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे.गेली वीस वर्ष रखडून पडलेली भुयारी मार्गांची कामं तात्काळ सुरू करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे शहापूर उपतालुकाप्रमुख बाळाराम तरणे यांनी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिला आहे.

मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पडघा नजीक खडवली फाट्याजवळ एका प्रवासी जीप खडवलीच्या दिशेकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना नाशिकच्या दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका भरधाव कंटेनरने प्रवासी जीपला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अशा अपघातात जीपमधून प्रवास करणाऱ्या चिन्मयी शिंदे, रिया परदेशी, चैताली पिंपळे,संतोष जाधव,वसंत जाधव ,प्रज्वल फिरके, या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे यांत तीन पुरुष तीन महिलांचा समावेश आहे.या अपघातात दिलीपकुमार विश्वकर्मा,चेतना जसे, कुणाल भामरे व यातील आणखी दोन जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकली नाहीत या सर्व जखमींना भिवंडी येथील मायरा हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी झालेल्या या जीपच्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

मुंबई नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण करताना तत्कालीन सरकारने कसारा ते पडघा पर्यंत महामार्गानजीक वसलेल्या गावांसाठी अंडरप्रास ब्रिज भुयारी मार्ग करण्याचे आदेश चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या सदभाव ग्यामन इंडिया कंपनीस दिले होते मात्र सदर कंपनीने सरकारचे हे आदेश बासनात गुंडाळून महामार्गाचे चौपदरीकरण करताना खडवली फाटा, कांदळी ,कासणे ,सारमाळ ,वासिंद, वेहळोली,या गावांजवळ अंडरपास ब्रिज (भुयारी मार्ग )तयारच केले नाहीत परिणामी रस्ता रस्ता ओलांडताना वाहन चालकांना जीवघेणा असा महामार्ग ओलांडून जावे लागत असल्याने महामार्गावर अपघात होत आहेत यांत निष्पाप लोकांचे जीव जात आहेत तर अनेकांना रस्ता ओलांडताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने कायमचे अपंगत्व देखील आलेले आहे या वाढत्या महामार्गावरील अपघाताच्या घटना पाहता मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरक्षा धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

खडवली फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर वासिंद ,खडवली, पडघा, परिसरातील नागरिकात एकच संतापची लाट पसरली असून अंडरप्रास ब्रिज च्या कामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहापूर भिवंडीतील स्थानिक आमदार, खासदार व पुढाऱ्या विरोधात सर्वसामान्य नागरिक व वाहन चालकात प्रचंड असंतोष पसरला असून अंडरपास ब्रिज भुयारी मार्ग हे सरकार केव्हा तयार करणार असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे तथापि महामार्ग प्राधिकरण यांनी अपूर्ण ठेवलेले अंडरपास ब्रिज भुयारी पुलांची कामे तात्काळ सुरू करावीत अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शिवसेना पक्षाचे शहापूर उपतालुकाप्रमुख बाळाराम तरणे यांनी दिला आहे. मंगळवारी प्रवासी जिल्हा झालेल्या अपघातानंतर सर्वत्र नागरिकात हळहळ व्यक्त केली जात असून पडघा शहरात बंद पाळण्यात आला तर संतप्त नागरिकांनी पडघा टोल नाका बंद पाडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पडघा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

रस्त्याची दुरावस्था मात्र पडघा टोल नाक्यावर वाहन चालकांकडून टोल वसुली सुरू

मुंबई नाशिक महामार्गाची पावसाळ्यात प्रचंड अशी दुर्दशा झाली महामार्गावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत हे खड्डे वाचतानाही वाहन चालकांना अपघात होत आहेत. पडघा, वासिंद, आटगाव ,खर्डी ते कसारा दरम्यान महामार्गाची रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे संबंधित रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या टोल कंपन्यांनी याकडे मात्र दुर्लक्ष केल्याने महामार्ग खड्ड्यात गेला आहे एकीकडे मात्र महामार्गाची ही दैना अवस्था असतानाही मात्र पडघा टोल नाक्यावर वाहन चालकांकडून सक्तीची टोल वसुली सुरू असल्याचा संताप जनक प्रकार मात्र सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!