मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी पत्रकार संघातर्फे दरवर्षी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले. शुक्रवार, दिनांक २१ जून, २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार्‍या पत्रकार संघाच्या ८३ व्या वर्धापन दिन सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या समारंभास  रामदास फुटाणे हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेले पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य यांना पत्रकार संघाचे सन्माननीय सदस्यत्व आणि सन्माननीय सहसदस्यत्व दिले जाणार आहे. हा समारंभ पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१ येथे संपन्न होईल.

पुरस्काराचे यंदाचे मानकरी पुढीलप्रमाणे 

शोधपत्रकारितेसाठी दिला जाणारा ‘पद्मश्री यमुनाताई खाडिलकर स्मृती पुरस्कार’ : पंकज दळवी.
वृत्तपत्रात काम केलेल्या ज्येष्ठ मुद्रितशोधकास दिला जाणारा ‘कविवर्य प्रा. भालचंद्र खांडेकर’ पुरस्कार :  प्रमोद तेंडुलकर
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘समतानंद अनंत हरि गद्रे’ पुरस्कार :  विजयकुमार बांदल.
वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून प्रदीर्घ कामगिरीबद्दल दिला जाणारा ‘अ‍ॅड. अधिक शिरोडकर पुरस्कृत तोलाराम कुकरेजा वृत्तछायाचित्रकार’ पुरस्कार :   संतोष बने आणि ज्येष्ठ पत्रकार/संपादकास दिला जाणारा ‘युगारंभकार, सर्वोदयी कार्यकर्ते मधुसूदन सीताराम रावकर स्मृती पुरस्कार’ :   लता राजे यांना जाहीर झाला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!