मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रूळ सिग्नल यंत्रणा आदींच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच मध्य रेल्वेरील नाहूर मुलुंडदरम्यान दोन गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेवरील सहा मार्गावर विशेष रात्रीचा वाहतूक पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर माटूंगा मुलूंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३. ५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल या ब्लॉक दरम्यान सीएसएमटी येथून सुटणा-या धीम्या मार्गावरील सेवा माटूंगा आणि मुलूंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलूंड या स्थानकांवर थांबून पून्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर ठाणे येथून अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील.
हार्बर रेल्वेवरील पनवेल वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल- बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल बेलापूरकडे जाणा-या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणा-या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्यासाठी सुटणा-या ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वाशी दरद्म्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे, वाशी, नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ गोरेगाव अप डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल.
नाहूर मुलुंडदरम्यान गर्डर टाकण्यासाठी ब्लॉक
गर्डर टाकण्यासाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी मध्यरात्री १ २० वाजेपासून ते रविवारी पहाटे ४ २० वाजेपर्यंत आणि शनिवारी रात्री १ २० ते रविवारी पहाटे ५ १५ पर्यंत विक्रोळी मुलुंउ दरम्यान अप डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मेल एक्सप्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ब्लॉक कालवधीत उपनगरीय सेवा रद्द राहतील.
- ब्लॉकपूर्वी छऋपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी शेवटची लोकल कल्याणहून रात्री ११ ५२ वाजता सुटेल तर ब्लॉकनंतर कल्याणकडे जाणारी पहिली कर्जत लोकल सीएसएमटीवरून पहाटे ४ ४७ वाजता सुटेल ब्लॉकनंतर सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कल्याणहून संध्याकाळी ४ ४८ वाजता सुटेल.