मुंबईचा लोंढा आवरायलाच हवा !

कुठलीही आपत्ती वा अपघात नसताना ही माणसं मरतात हि घटना दुर्लभ म्हणता येईल . आजवर अतिरेक्यांना वा गुंडांना माणसं मारण्यासाठी शस्त्रांचा वापर करावा लागला मात्र एक अफवा सुद्धा माणसाचा प्राण घेते . 29 सप्टेंबरच्या शुक्रवारी मुंबईतील एल्फिस्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर एक अफवा पसरली आणि जगण्याच्या भीतीने सैरवैर उडालेल्या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरामध्ये 23  निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर 50 हुन अधिक जण जखमी झाले . ना वीज कडाडली ना पूल कोसळला . फक्त जमली होती ती गर्दी अन त्या गर्दीत पसरलेली अफवा या बळीला कारणीभूत ठरली . 10 वर्षांपूर्वी रेल्वेला 9 डब्बे होते . त्या मानाने लोकसंख्या कमीच म्हणावी जसे जसे युपी बिहार मधून लोंढेच्या लोंढे वाढत गेले तस तसे रेल्वेचे डब्बे सुद्धा वाढत गेले . 9 डब्यांची रेल्वे आज 12 ते 15 डब्यांची झाली पुढे आणखी डब्बे वाढतील . डब्बे वाढले मात्र स्टेशन मध्ये सुविधांची वानवा निर्माण झाली . रेल्वे स्टेशन , रेल्वे पूल प्रवाशाना अपुरे होत गेले . वाढणाऱ्या लोंढ्यानी रेल्वे स्थानका बाहेर , रेल्वे पुलावर आक्रमण करून रोजरास धंदे सुरु केले . प्रवाशाना चालण्यासाठी स्टेशन बाहेर स्कायवॉक बांधून शासनाने कोटी रुपये उधळून प्रत्येक रेल्वे स्टेशनला जोडून बांधले आज हे स्कायवॉक देखील फेरीवाल्यांनी काबीज केलेले दिसतात . सकाळ , संध्याकाळ रेल्वे स्थानकातून बाहेर पडायला पाय ठेवायला सुद्धा जागा राहत नाही . या फेरीवाल्यामुळे स्थानका भोवती सांयकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी देखील होते . हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते . पालिका आणि पोलिसांना हे चित्र दिसते मात्र सोंग करण्या पलीकडे त्यांची कोणतीच भूमिका उरत नाही . येथे माणसाच्या समस्येला वा जाणिवांना कोणतीच किंमत नाही. किंमत फक्त माणूस मेल्यावर अन जखमी झाल्यावर . मरेल त्याला लाख रुपये आणि जखमी त्याला 50 हजार रुपये हीच काय ती माणसाची किंमत शासनाने ठरवलेली आहे . असो अशा घटना आणि प्रसंग मुंबईला नवे नाही . कारण मुंबई आजवर ते झेलत आली आहे . देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे मिशन देशात सुरु केले आहे . देशाला स्वच्छ भारत पेक्षा स्वच्छतेची शिकवण गरजेची  वाटते . कारण आपल्या भारतीय नागरिकांकडे ती शिकवण दिसत नाही  . दिसेल तिथे थुंकने , लघु शंका करणे , कचरा टाकणे ,  आरडा ओरडा करने, सिग्नल तोडणे आदी भारतीयांच्या वागणुकीत अगोदर स्वच्छ वागणूक आणणे गरजेचे आहे . शाळा , महाविद्यालयात सुद्धा रांगेतून चाला , कृपया डाव्या बाजूने चाला असे शिकवले जायचे पण ही शिकवण घेतेय कोण ? आपल्यापासूनच स्वच्छतेची सुरूवात होईल त्यावेळीच  खऱ्या अर्थाने भारत स्वच्छ होईल .

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे . महासत्तेच्या दिशेने निघालेल्या आपल्या देशाचा विकासाचा पहिला टप्पा मुंबईतून सुरु झालेला दिसतो आहे . टोलेंजग इमारती , हायस्पीड रस्ते , विमानतळ , उड्डाण पूल , सागरी वाहतूक , मॉल , हॉटेल्स , औद्योगिक कारखाने आणि त्यात आता अतिवेगवान प्रवास म्हणजे बुलेट ट्रेन . जी आता सर्वांच्याच चर्चेचा विषय बनली आहे . मुंबईत जस जसे नवे प्रोजेक्ट नवे प्रकल्प उभे राहत आहेत तसेच रोजगाराच्या संधी देखील उभ्या राहत आहे . मुंबईला आर्थिक कणा समजून रोजगारासाठी बाहेरील राज्यातून लोंढेच्या लोंढे मुंबईकडे वळत आहे . मुंबईच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे . लोंढ्यांच्या संख्येचा परिणाम इथल्या भूमीपुत्रावर तर होतच आहे मात्र इथल्या मुलं संस्कृती आणि परंपरेवर देखील त्याचा परिणाम जाणवतो आहे . भाषा ही प्रत्येक राज्याची ओळख आहे . मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा . इथल्या व्यवहार , कारोभार , उद्योग , शिक्षण , कला , संस्कृती आणि परंपरेची मराठी ही बोली भाषा आहे . मात्र गेल्या वीस वर्षांपासून इथली मराठी भाषा सुद्धा हळू हळू लोप पावत आहे . इथल्या मराठी भाषेचा केवळ घरगुती पुरताचं वापर होताना दिसतो आहे. आज मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी इतर भाषेचे शब्दच कानावर कर्णकर्कश करतात . पाय कापला तर माणूस उभा राहू शकत नाही किंवा चालू शकत नाही . मराठी भाषा अशीच मारली गेली आहे . महानगर पालिकेच्या मराठी शाळा पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत . मराठी शाळा बंद केल्या तर मराठी भाषेचा मुळ पाया कापलाच म्हणून समजा . मराठी भाषा आणि इथला मराठी टक्का कमी होण्याचं कारण म्हणजे मुंबईत वाढणारा लोंढा हे वेगळ सांगायला नको .

 निलेश पांडुरंग मोरे ( पत्रकार )
मो – 9867477598/ 9757381100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!