मुंबई, 28 ऑक्टोबर . रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. २० कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालू, अशी धमकी देणाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी धमकीचा ई-मेल आला होता. मुंबईतील गमदेवी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या व्यक्तीने ई-मेलमध्ये लिहिले आहे की, त्याच्याकडे उत्तम शार्प शूटर आहेत. जर त्याला पैसे मिळाले नाहीत तर तो त्यांना मारून टाकेल. धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गमदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.