डेहराडून, 05 मार्च : 21 फेब्रुवारीपासून आगामी चारधाम यात्रेसाठी एकूण नोंदणीची संख्या 2 लाखांहून अधिक झाली आहे. बद्रीनाथ आणि केदारधाम येथील एकूण 2,033,24 यात्रेकरूंनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे.
पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरांसाठी एकूण 2,033,24 यात्रेकरूंची नोंदणी झाली आहे. ज्यामध्ये केदारनाथ धामसाठी एकूण 1,118,71 आणि बद्रीनाथ धामसाठी 91,453 यात्रेकरूंची नोंदणी झाली आहे.
25 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेसाठी प्रशासनाने येणाऱ्या यात्रेकरूंची योग्य आरोग्य तपासणी केली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आहे, ज्यात डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांची तैनाती, आरोग्यासाठी आवश्यक वस्तू आणि औषधांचा पुरेसा साठा इत्यादि आहे.
यावर्षी चार धाम नोंदणीसाठी चार माध्यमांचा अवलंब करण्यात आला आहे. भाविक यात्रेसाठी वेबसाइट, कॉल, व्हॉट्सअॅप आणि मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करू शकतात. आतापर्यंत 1,520,24 यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी झाली आहे, तर 26,255 आणि 15,045 यात्रेकरूंची मोबाइल अॅप आणि व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी झाली आहे. भाविक https://registrationandtouristcare.uk.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. आणि व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणी करण्यासाठी, “यात्रा” टाइप करा आणि 91 8394833833 वर पाठवा.
सरकारने भाविकांसाठी प्रवासाशी संबंधित माहिती आणि सूचनांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. या हेल्पलाइन क्रमांकांमध्ये चार धाम टोल फ्री क्र. 1364 आणि 0135-1364 (इतर राज्यांसाठी), चार धाम नियंत्रण कक्ष क्र. 0135-2559898, 2552627, आपत्ती व्यवस्थापन क्र. ०१३५-२७६०६६, १०७० (टोल फ्री) इत्यादी क्रमांकांवर कॉल करून आवश्यक माहिती मिळवता येईल.