कच्छच्या मैदानातून मोदींच्या मेगा प्रचारास सुरुवात 
 गुजरात/(संतोष गायकवाड)  : साऱ्या देशाचे लक्ष वेधलेल्या गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारासाठी आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये दाखल झालेत. आज सकाळी कच्छ येथील आशापुरा मंदिरात दर्शन घेऊन मोदींच्या मेगा प्रचारास प्रारंभ झाला.
गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी 9 व 14 डिसेंबर 2017 ला निवडणूक होत आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा धुराळा उडाला होता.  राहुल गांधींच्या प्रचार सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला.  त्यामुळे मोदी प्रचारात कधी उतरणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते. कच्छ येथील 1500 वर्ष ऐतिहासिक आशापुरा मंदिरात दर्शन घेऊन मोदींनी  भाजपच्या प्रचाराचा श्री गणेशा केला. मोदींना भेटण्यासाठी खूप गर्दी उसळली होती. महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज मोदींच्या 4 रॅली निघणार आहेत. ही रॅली 24 विधानसभा क्षेत्रात निघणार आहे. 29   नोव्हेेंबरलाही सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातला मोदींच्या 4 रॅली निघणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!