मोदींकडून आदित्य ठाकरे आणि सचिनचे कौतूक
दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे , मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांचं कौतुक केलं आहे.
आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी स्वत: हातात झाडू घेऊन मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली. एरव्ही मैदानावर सगळयांचे लक्ष वेधून घेतलेल्या सचिनने हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन सचिनने केलं.
“माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो” असे ट्विट करुन मोदींनी आदित्यचे जाहीर कौतूक केले आहे. दोन दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने महागाईविरोधात मोर्चा काढून मोदी यांच्या विरोधात शेलक्या भाषेत टीका केली होती.