कल्याण : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात मोठे अपघात झाल्यास रेल्वे प्रशासनासह स्थानिक सुरक्षा यंत्रणा व राष्ट्रीय आपत्ती दलासह एनडीआरएफच्या पथकाने संयुक्त रित्या अपघाता समयी बचावकार्य कसे करावे यासाठी आज कल्याण रेल्वे यार्डमध्ये थरारक मॉकड्रिल पार पडले.

एखाद्या रेल्वेच्या जळत्या बोगीत अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार करण्यात आली. यासाठी एनडीआरएफ, रुग्णवाहिका, कल्याण डोंबिवली अग्निशमन दल सज्ज असल्याचे रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. त्यांनतर एनडीआरएफ घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. यावेळी बोगीच्या वरून आणि खिडक्यांमधून भाग कापला गेला. त्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ डब्यात घुसले.


आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर केला होता. तसेच रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. यावेळी रेल्वे संरक्षण दलानेही मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते. बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफने थरारक रित्या मदत केली. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी बोगीत शिरून आग पूर्णपणे विझवली.सर्व प्रवाशांना जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचे मापदंड देखील तपासले. यावेळी शशांक मेहरोत्रा, मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे हॉस्पिटलचे रॉबिन कालिया, वरिष्ठ विभागीय सुरक्षा अधिकारी, डॉ ए. के. सिंह, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *