कल्याण रेल्वे स्थानकातील प्रकार सीसीटिव्हीत कैद
कल्याण : उत्तरप्रदेशहून येत असलेल्या आपल्या नातेवाईकांची कल्याण रेल्वे स्थानकात वाट पाहणे दोन भावांना चांगलेच महागात पडले आहे. कल्याण पूर्वेकडील तिकिट खिडकीजवळ दोघेही बसलेले असतानाच, तीन लुटारूंनी त्यांना चाकूचा धाक दाखवित लुटल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसी कॅमे-यात कैद झालाय, त्याच्या आधारेच पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र नेहमीच घडणा-या या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून रेल्वे स्थानकात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.
कल्याण पूर्व भागात राहणारा निरज वर्मा हा सोमवारी रात्री उत्तर प्रदेशातून येणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी रात्री आपल्या दोन भावांसह कल्याण रेल्वे स्टेशनला आला, कल्याण पूर्वेकडील रेल्वे तिकीट घरा जवळ तो आपल्या भावासोबत बसला होता. नीरज गाडीची वाट पाहत असतानाच अचानक तीन तरुण त्यांच्याजवळ आले. चाकूचा धाक दाखवून या तिघांनी नीरज व त्याच्या भावाकडून मोबाईल हिसकावून घेत तेथून पळ काढला. मात्र त्याच्याकडे धारदार चाकू असल्याने त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही त्यामुळे त्या दोघांचे जीव वाचले. ही घटना सीसी कॅमे-यात मध्ये कैद झाली होती या प्रकरणी नीरज याने कल्याण रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली रेल्वे पोलिसांसह कल्याण क्राईम ब्रॅन्च या घटनेचा तपास करीत होती मात्र पोलिसांनी सीसी कॅमे-याच्या आधारे अवघ्या २४ तासात श्रेयस कांबळे, आकाश माने आणि रूपेश कनोजिया या तिघांना अटक केली त्यांच्याकडून गुप्तीसह दोन मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत