मनसे विद्यार्थी सेनेची दिवाळी आदिवासी पाडयात साजरी 

डोंबिवली :  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, डोंबिवली शहरच्यावतीने दरवर्षी प्रमाणे  यंदाही दिवाळीचा पहिला दिवस आदिवासीबांधवांसोबत साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने शहापुर येथील कांदली आदिवासीपाड्यात  दिवाळीचा फराळ, मिठाई,  नवीन कपड़े, महिलांसाठी साड़या, लहान तसेच मोठ्यांनसाठी, बच्चेकंपनीला कपडयाचे वाटप करण्यात आले.  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे डोंबिवली शहर अध्यक्ष समीर पालांडे , शहर सचिव प्रितेश पाटील, उपशहर अध्यक्ष वेद पांडे, मिलिंद म्हात्रे, शाखा अध्यक्ष सिद्धार्थ खैरे, संकेत शिरसोळकर, आकाश वाटुळकर आदी कार्यकर्ते  उपस्थित होते..आपल्या आनंदा सोबत त्याच ही आनंद द्वीगुणीत  करणे हाच यामागचा हेतू असल्याचे पालांडे यांनी सांगितले. यावेळी आदिवासी बांधवांच्या चेह-यावर आनंद पसरला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!