मनसेचा मोर्चा : आयोजकांवर गुन्हा
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे प्रशासनाविरोधात भव्य मोर्चा काढल्यानंतर पोलिसांनी सार्वजनिक रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी आयोजकांवर जमावबंदीचा आदेश मोडल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याची कायदेशीर परवानगी न घेता ‘ रेल्वे प्रशासनाचा धिक्कार असो, रेल्वे प्रशासन मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी करून मेट्रो सिनेमा चौक ते चर्चगेट असा पायी मोर्चा काढला त्यामुळे सार्वजनिक रहदारीस अडथळा झाला तसेच .पोलीस आयुक्तांचा जमावबंदी आदेशाचेही उल्लंघन करण्यात आले यामुळे आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
