मनसेच्या नेतेपदी राजू पाटील यांची निवड

डोंबिवली : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या नेतेपदी राजू पाटील आणि अभिजित पानसरे यांची  तर ठाणे जिल्हा अध्यक्षपदी अविनाश जाधव यांची निवड करण्यात आलीय.  ठाण्याच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी  यांच्या नावाची घोषणा केली. राजू पाटील हे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणूनच ओळखले जातात. कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूचा परिसर अशा संपूर्ण ठाणे जिल्हयात मनसे संघटना मजबूत करण्यात राजू पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. 2014 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र मोदी लाट असतानाही त्यांनी एक लाखाहून अधिक मते मिळवली हेाती. मनमिळावू स्वभावाचे व प्रत्येकाच्या मदतीसाठी धावून जाणारा नेता म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबध आहेत.  राजू पाटील यांच्या निवडीमुळे मनसैनिकांमध्ये जोशाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!