संजय निरूपम यांच्या सभेत मनसैनिकांचा राडा
माईक हिसकावून, राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा

घाटकोपर ( निलेश मोरे ) : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पंतनगर मधील सभेत मनसेने व्यासपीठावर चढून राडा घातला. मनसैनिकानी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला. राज ठाकरे झिंदाबादच्या घोषणा देत सभा उधळून लावली.

मागील काही महिन्यापासून मनसे विरुद्ध फेरीवाले हा वाद कायम आहे . मालाड मध्ये मनसे विभाग अध्यक्षांवर फेरीवाल्यांनी मारहाण केल्यानंतर याचा मारहाणीचा निषेधार्थ आज मनसेचे शाखाध्यक्ष राजू सावंत यांनी घाटकोपरच्या संजय गांधी नगर येथील आयोजित करण्यात आलेल्या सभेत राडा घालत सभा उधवस्त केली . घाटकोपर पूर्व संजय गांधी नगर परिसरात नालाबाधीत झोपड्पट्टीवासीयांसाठी काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांची पूर्वनियोजित सभा आयोजित करण्यात आली होती . दरम्यान या सभेत काही फेरीवाल्यांनी व व्यापारांनी निरुपम यांच्याकडे निवेदन सादर केले त्यावेळी निरुपम यांनी फेरीवाल्याना सभेतून आश्वासन देताना आज सुप्रीम कोर्टाने जरी निकाल आपल्या विरुद्ध लावला असला तरी फेरीवाल्यासाठीची माझी लढाई ही अखेरच्या श्वासा पर्यंत सुरूच राहणार असल्याचं वक्तव्य करताच मनसेचे शाखाध्यक्ष राजू सावंत यांनी थेट व्यासपीठावर जाऊन काँग्रेस कार्यकर्त्याच्या हातातून माईक खेचून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो , राज साहेब आज बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत संजय निरुपम यानां शिवीगाळ करत राडा घातला यावेळी मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी सभेतील खुर्च्या फेकून सभा उधवस्त करून लावली . यावेळी मनसे कार्यकर्ते व काँग्रेस कार्यकर्त्यांत जोरदार हातापाई होऊन घोषणाबाजी झाली . पंतनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

 पोलिसांचा कडक बंदोबसत्तात सभा उधवस्त 

मुंबई अध्यक्ष संजय निरुपम हे  सभेला उपस्थित राहणार असल्याने पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल फडके यांनी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता . मनसे विरुद्ध संजय निरुपम असा वाद माहीत असताना पोलिसांनी सावध भूमिका  घेतली नसल्याचे दिसून आले.  अखेर पोलीस बंदोबस्तात मनसे कार्यकर्त्याने व्यासपीठावर चढून सभा उधळली.

 निरूपमची दादागिरी चालू देणार नाही : शिरीष सावंत

सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असताना निरुपम यांनी विनाकारण सभेत फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित करण्याची गरज नव्हती . मात्र झोपडंपट्टीवासियांच्या घरासाठी मार्गदर्शन करायचे सोडून निरुपम यांनी पुन्हा फेरीवाला प्रकरण उकरल्याने मनसे कार्यकर्ते संताप करणार हे स्वाभाविकच आहे . मुंबई मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाचीच राहणार येथे परप्रांतीयांचे पोषक बनून निरुपम यांने दादागिरी करू नये ही दादागिरी मनसे खपवू घेणार नाही अशी प्रतिक्रिया  मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी दिली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *