चोरून फक्त छक्के घेऊन गेले : मनसेची शिवसेनेवर जहरी टीका
मुंबई : मनसेतून फुटून सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यानंतर मनसेने पोस्टरबाजीतून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. ‘मागितले असते तर सात दिले असते, चोरुन फक्त छक्के घेऊन गेले’ असा मजकूर पोस्टवर लिहिलाय.
भांडूप पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर पक्षाचे खासदार किरीट सोमयया यांनी महापालिकेवर भाजपचा महापौर बसविण्याचे आव्हान शिवसेनेला दिले होते. निवडणुकीतील पराभवानंतर खचलेल्या शिवसेनेने महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी मनसेचे सहा नगरसेवक फोडून आपल्या गोटात आणीत भाजपच्या सत्तेचे स्वप्न धुळीस मिळवले. शिवसेनेच्या या राजकीय खेळीमुहे दुखावलेल्या मनसेने पोस्टबाजीच्या माध्यमातून सेनेला उत्तर दिले आहे. दादर परिसरात हे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो आहे. या पोस्टबाजीमुळे शिवसेना व मनसेतील वाद आणखीनच चिघळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *