डोंबिवली : जागतिक छायचित्र दिनानिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी छायाचित्रकारांना यांना मोफत कोविड लस उपलब्ध करून दिली . लस घेण्यासाठी डोंबिवली, कल्याण, मुलुंड, अंधेरी, मालाड आणि मुंबई येथील फोटोग्राफर उपस्थित होते.सुमारे १५० जणांना यात मोफत लस देण्यात आली असे फोटोग्राफर विवेक भणगे यांनी सांगितले.

डोंबिवली फोटोग्राफी सोसायटी या संस्थेने मनसे आमदार राजू पाटील यांचेकडे फोटोग्राफरसाठी लस उपलब्ध करून घ्या अशी मागणी केली होती.ही मागणी त्वरित मान्य करून मनसे आमदार यांनी औचित्य साधून फोटोग्राफर्स बंधू आणि भगिनींसाठी कोव्हीशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे.डोंबिवली पूर्वेतील सर्वेश हॉल येथे या शिबीराचे आयोजन केले असून लस घेण्यासाठी डोंबिवली, कल्याण, मुलुंड, अंधेरी, मालाड आणि मुंबई येथील फोटोग्राफर उपस्थित होते.सुमारे १५० जणांना यात मोफत लस देण्यात आली असे .शिबीर यशस्वी होण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि डोंबिवली फोटोग्राफी सोसायटीचे सद्यस उपस्थित होते. यापूर्वीही मनसे आमदार यांनी पत्रकार, रिक्षाचालक , नाभिक , जिम चालक आणि मनसे पदाधिकारी यांना मोफत लस दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!