डोंबिवली-पुणे शिवशाही ACबस सुरू करावी ; मनसेचे परिवहन मंत्र्यांना साकडं
डोंबिवली : डोंबिवली-पुणे शिवशाही AC बस सुरू करावी व कल्याण RTO नविन जागेवर व अद्यावत,सर्व सोयी सुविधायुक्त नविन इमारत उभारावी या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांची भेट घेऊन केली. याप्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, कल्याण डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे व संदेश प्रभुदेसाई उपस्थित होते.
डोंबिवलीहुन पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांसाठी शिवशाही बसची सुविधा मिळावी असे मनसेचे म्हणणे आहे. तसेच आरटीओच्या जुन्या जागेमुळे अनेक गैरसोयी आणि समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवीन जागेवर अत्याधुनिक कार्यालयाची इमारत बांधण्यात यावी याकडं मनसेच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावेळी परिवहन मंत्र्यांनी निधी उपलब्ध होताच आरटीओ इमारतीचे काम सुरू करण्याचे तसेच शिवशाही बस सुरू करण्याचे आश्वासन दिले अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.