डोंबिवलीतील मनसैनिकांना एक दिवसांची पोलीस कोठडी
तर कल्याणच्या मनसैनिकांची जामीनावर सुटका
डोंबिवली ; रेल्वे स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी सोमवारी कल्याण डोंबिवलीतील मनसैनिकांना सोमवारी पोलिसांनी अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले. यातील कल्याणच्या मनसैनिकांची जामीन सुटका करण्यात आली आहे तर डोंबिवलीच्या ११ मनसैनिकांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी 15 दिवसाची मुदत दिली होती. ही मुदत उलटताच कल्याण डोंबिवलीतील मनसेने फेरीवाल्यांविरोधात आंदोलन छेडले होते यावेळी त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावत त्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले होते. यानंतर आता पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली आहे. डोंबिवलीतील मनसेचे शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत , नगरसेवक प्रकाश गोपीनाथ भोईर , प्रल्हाद म्हात्रे , प्रकाश माने, सागर रवींद्र जेधे, रवींद्र गरुड , सिद्धार्थ मातोंडकर , अजय शिंदे , रतिकेश गवळी, गणेश गावडे, कृष्णा देवकर या अकरा जणांना एक दिवसाची पोलीस मिळाली आहे. तर कल्याणातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई,यांच्यासह अन्य दोघांना अटक करून त्यांना कल्याण न्यायालयाने वैयक्तिक जातमुचलक्यावर जमीनावर सुटका केली आहे.
फेरीवाल्यांविरोधात पालिकेची कारवाई
रविवारी मनसेने फेरीवाल्यांविरोधात ‘खळळ खट्याक’ आंदोलन केल्यानंतर केडीएमसी प्रशासनाला जाग आली. पालिका आयुक्त वेलारासू यांनी या आंदोलनाची दखल घेत कल्याण डेांबिवली परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानंतर संध्याकाळी पालिका प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली. मात्र ही कारवाईचा फार्स किती दिवस राहणार अशीच चर्चा कल्याण डेांबिवलीकरांमध्ये पसरली होती.