मनसे आमदार राजू पाटील यांचा पुढाकार.

डोंबिवली :  मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन हजार महाराष्ट्र सैनिकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण करण्यात आले.

कल्याण डोंबिवली तसेच दिव्यातील रिक्षा चालक, नाभिक, पत्रकार, जिम चालक यांचे सर्वात पहिले स्वखर्चाने लसीकरण केले. यानंतर 2000 मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मोफत लसीकरण शनिवार आणि रविवारी संपन्न झाले.या शिबिरात कल्याण पूर्व, डोंबिवली, ग्रामीण, दिवा , शीळ आणि १४ गावातील कार्यकर्त्यांचे लसीकरण करून घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *