मराठी भाषेचा वापर आता व्यवहारात आणि कार्यालयात करा..
राज ठाकरेंचे इशारा पत्र, डोंबिवलीत सर्व कार्यालयात पोहचले
डोंबिवली : मराठी भाषेचा वापर कार्यालयीन कामकाजात व व्यवहारात व्हावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इशारापत्र आज डोंबिवली मनसेच्यावतीने शहरातील सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना देण्यात आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुकानावर मराठी पाटयाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभर आंदोलन छेडले होत. त्यानंतर दुकानावर मराठी पाटया लागल्या गेल्या. मराठी पाटयांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा वापर कार्यालयीन कामकाजात व व्यवहारात करण्यात यावा असा इशारा दिलाय. डोंबिवली मनसेच्यावतीने हे इशारापत्र पोस्ट ऑफीस, डोंबिवली रेल्वे स्थानक, एच.डी.एफ.सी. बॅंक, स्टेट बॅंक आफ इंडीया व भारतीय आयुर्विमा महामंडळ आदी कार्यालयांना देण्यात आले. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे, माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक, निलेश भोसले, दीपक शिंदे, मिलिंद गायकवाड, राजू पाटील, निषाद पाटील, विजय शिंदे, रमेश यादव, स्मिता भणगे, श्रद्धा किरवे, प्रितेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकत्यांनी हे इशारापत्र संबधित कार्यालयांना दिले .