मोदी आणि फडणवीस सरकारच्या आश्वासनाचे फुउउऽऽऽ* चे बुडबुडे ; मनसेकडून १ एप्रिल फेकू दिन म्हणून साजरा 

डोंबिवली : मनसेच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने आज १ एप्रिल हा मोदी दिवस फेकू दिन म्हणून साजरा करण्यात आला. मोदी सरकारने दाखवलेले अच्छे दिनाचे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीसाठी जाहीर केलेले ६५०० कोटीचे पकेज, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिकेचे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासन बाबत फुउउऽऽऽ* चे बुडबुडे सोडण्यात आले. मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हा फेकू दिन साजरा झाला. यावेळी मनविसेचे डोंबिवली शहराध्यक्ष समीर जेधे, महेश कदम, नवले, अभिजित नाफडे, ओम लोके,तुषार महादलकर आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *