खड्ड्याच्या निषेधार्थ मनसेचे अनोखे आंदोलन
डोंबिवली – शहरातील वाढत्या खड्ड्याच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना भाजप व प्रशासनाविरोधात मनसेने अनोखे आंदोलन केले. लोकमान्य टिळकांची वेशभूषा करून महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का, खड्डे मुक्त हा जन्मसिद्ध हक्क आहे अशी घोषणाबाजी मनसेने केली.
डोंबिवली, एमआयडीसी निवासी विभाग आणि २७ गाव येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. महिन्या भरापूर्वी दुरुस्ती केलेले टिळक पुतळा ते मंजुनाथ विद्यालय रस्ता , उद्योग नगर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सत्ताधारीसेना- भाजप आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महापालिकेचे डोके ठिकाणावर आहे का ? हा सवाल करून आंदोलन केले.
विशेषतः महापौर, स्थायी समिती सभापती, डोंबिवली आमदार तथा राज्यमंत्री ,आणि प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या मतांवर निवडून येणारे हाडांचे डॉक्टर खासदार एवढी मोठी ताकद डोंबिवली करांची असून सुद्धा आज डोंबिवली कर दात्या नागरिकांना या खड्ड्यांमुळे हाड मोडून घ्यावी लागत आहेत अशी टीका मनसेने केली.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम , शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले सदर आंदोलनात जिल्हा संघटक राहुल कामत,जिल्ह्या अध्यक्षा दीपिका पेडणेकर ,जिल्हा उपाध्यक्ष सुदेश चुडणाईक, उपजिल्हा सचिव निलेश भोसले , शहर अध्यक्षा मंदाताई पाटील ,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सागर जेधे ,ग्रामीण पदाधिकारी राजेश म्हात्रे,गजेंद्र पवार ,शहर संघटक संजीव ताम्हाणे,राजेश मुणगेकर,मनोज राजे,हरीश पाटील,उपशहर अध्यक्ष, मिलिंद गायकवाड, दीपक शिंदे,शहर सचिव सुभाष कदम , अरुण जांभळे व टिळकांच्या वेशामध्ये निलेश कानेटकर आणि मोठ्या संख्येने मनसेचे सहकारी उपस्थित होते.
*****