कल्याण ; कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना होऊन आज 37 वर्षे पूर्ण झाली असली तरी महापालिका क्षेत्रांत फारसा विकास झालेला दिसत नाही. पालिकेचे आयुर्मान वाढत असताना विकासाच्या दृष्टीने मात्र महापालिकेचा उलट दिशेने प्रवास सुरु असून आज डोंबिवली मनसे च्या वतीने रस्त्यावरील  खड्यात महापालिकेची प्रतिकृती ठेवत खड्ड्यात गेलेल्या महापालिकेचा वर्धापनदिन केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी मनसे कडून महापालिका विरोधात घोषणा देऊन निषेध केला ,रस्ते दुरुस्त झालेच पाहिजेत अशी घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान ही कल्याण डोंबिवली नव्हे तर खड्यात डोंबिवली महापालिका असल्याची उपरोधिक टीका मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!