ठाणे : ठाणे- भिवंडी रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावर खड्डे पडले असतानाही टोल वसुली सुरू असल्याच्या निषेधार्थ मनसैनिकांकडून कशेळी टोल नाक्याची तोडफोड केली.
ठाणे भिवंडी रस्त्यावरील खड्डयांमुळे प्रचंड प्रमाणत वाहतूक कोंडी हेात असल्याने वाहनचालकांसह नागरिकांनाही त्रास स्हन करावा लागत आहे. तसेच गरोदर महिलांसह वृध्दांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती तसेच काही दिवसांपूर्वी मनसेने मुंडन आंदेालन केले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात आली नव्हती. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही मनसेकडून देण्यात आला होता अखेर सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव संजय पाटील व मनसे वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी टोलनाक्याची तोडफोड करीत टोल कंपनीच्या व्यवस्थापनासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराचा जाहीर निषेध केला पेालिसांनी मनसैनिकांना अटक केली.