मनसे  करमाळा तालुका संपर्कप्रमुखपदी रामराजे जगताप यांची नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी) : मनसेच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका संपर्कप्रमुखपदी रामराजे जगताप यांची नियुक्ती करण्यात आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही नियुक्ती केली. यावेळी मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण हे उपस्थित होते.
मुंबईतील कृष्णकुंज येथील निवासस्थानी मनसेचे रामराजे जगताप यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली. यावेळी विकी ढोणे, रंगनाथ सरवदे, शुभम जगताप, समाधान जगताप, स्वप्नील धाळनेर, दीपक जगताप आदी उपस्थित होते.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *