मुंबई : चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरूध्द नारायण राणे असा सामना रंगलेला सर्वांनीच पाहिला. मात्र त्यानंतर मुंबईतील खड्डयांवरून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा,” असा सल्ला भाजपाचे आमदार नितेश राणे मुंबईच्या महापौर किशोरी पेंडणेकर यांना दिला. या संदर्भात महापौरांना पत्र पाठवण्यात आले आहे. दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचे महापौरांनी सांगितलय.
मुंबईतील रस्त्याची दुरावस्था झालीय खड्डे भरण्यापेक्षा काँन्ट्रॅक्टरचे आपले खिशे भरण्याचे काम सुरू आहे मुंबईकरांना चांगले रस्ते मिळत नसतील तर मुंबई महापालिका करते काय ? यासाठी भाजप युवा मोर्चाने आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर लाठीमार केला जातो. दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यात ठोस पावलं उचलली नाहीत तर कार्यकर्त्यांसह मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावरती उतरण्याचा इशाराही नितेश राणे यांनी महापौर पेडणेकरांना दिलाय.