कुटुंबीयांसह मुलीला संरक्षण देणार – देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई – ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. तसेच आव्हाड यांच्या कुटुंबाला आणि मुलीला संरक्षण देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ठाण्यातील मनपाच्या अधिकाऱ्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विशेष बाब म्हणून उपस्थित केला. आमदाराला उघडपणे धमकी देणाऱ्याला ठाणे मनपा अधिकाऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभय मिळत असल्याचे समजते. एका आमदाराला धमकी आल्यानंतर त्यावर कारवाई करण्याऐवजी सुरक्षा कवच देणे, ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, ही अतिशय गंभीर बाब असून निषेधार्ह आहे. त्यामुळे या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, संबंधित अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडी अधिकाऱ्यांमार्फत त्याची चौकशी केली जाईल. तसेच एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. त्याचा अहवाल आला की कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन गृहमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले. सा दावा केला.

अधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, सभापतीचे निर्देश

सभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्यात लोकप्रतिनिधींना येणाऱ्या धमक्यांची बाब गृहमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच आव्हाड प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असे निर्देश राज्यसरकारला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!