कल्याण : शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड अटकेत आहेत. मात्र ठाण्यातील राज्य शासनाच्या कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांचं नाव प्रमुख पाहुणे म्हणून असल्याने एकच चर्चा सुरु झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.    

ठाण्यात राज्य सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. कोकण विभागामार्फत मॉडेला मिल कम्पाउंड वागळे इस्टेट चेक नाका ठाणे येथे होत आहे बुधवार  दि ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार गणपत गायकवाड यांचेही  नाव पाहुण्यांमध्ये आल्याने या रोजगार मेळाव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!