कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ मार्गास मंजुरी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मेट्रो रेल्वेच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा विस्तार कासारवडवली ते गायमुख या मेट्रो 4 अ मार्गास मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर परिसरातील सर्व मेट्रो रेल्वेच्या कामांचे कार्यारंभ आदेश 2018 पर्यंत देऊन कामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 144 वी बैठक मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रो मार्ग 4 अ हा कासारवडवली ते गायमुख हा सुमारे 2.7 किमी यामध्ये दोन नवीन स्थानके येणार आहेत. या मार्गासाठी सुमारे 949 कोटी रुपये खर्च होणार आहे. या मार्गामुळे सन 2021मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता वाढणार असून 2031 मध्ये ही क्षमता एकूण 13.44 लाख एवढी होणार आहे. वडाळा ते कासारवडवली हा मेट्रो 4 मार्ग 32.3 किमीचा असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. – मुंबई शहराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 8 वरील वसई – भाईंदर खाडीवरील पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात यावेत. भिवंडी परिसरातील ट्रान्सपोर्ट हब व लॉजिस्टिक पार्कचे काम तातडीने सुरू करण्यात यावे. मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या डब्ब्यांची निर्मिती महाराष्ट्रात व्हावी, यासाठी उत्पादक कंपन्यांबरोबर बोलणी करण्यात यावी. तसेच मोनोरेल्वेचा नवा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचे प्रवासी भाडे हे मेट्रो रेल्वेच्या समकक्ष ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, गृह निर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, एमएमआरडीचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, बृह्नमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीचे सहआयुक्त प्रवीण दराडे, संजय देशमुख सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी यावेळी उपस्थित होते.
काय दिले आदेश..

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *