मुंबई : गेल्या महिनाभरात वर्षा बगंल्यात आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर राजकीय बैठकांच्या नावाखाली गुंड टोळयाच्या म्होरक्यांसोबत बैठका घेतल्या जता आहेत. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी हे घडवून आणत आहे  असा खळबळजनक आरोप वज शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या अधिका- याचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. त्यामुळे गुंडांच्या बैठका घेणारा मुंबईतील पोलीस अधिकारी कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पूत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचे गुंडासोबतचे फोटो प्रसिध्द झाल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी सरकारला धोरवर धरले आहे. आज मी एक फोटो टाकलाय,तसा मी रोज टाकणार आहे असा इशाराही राऊत यांनी दिला. 
राऊत म्हणाले की,  खून दरोडे बलात्कार यातील आरोपी असलेले आणि जामिनावर बाहेर काढलेले गुंड मुख्यमंत्रयांशी बोलून नक्की काय चर्चा करत आहेत. या गुंडाचा वापर राज्याचे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करणार आहे का ? का उद्याच्या निवडणुकीत विरोधकांचे मुडदे पाडण्यासाठी करणार आहेत ? असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.   मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतो आहे, याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे, असाही राऊत यांनी यावेळी सुनावलं. 

रोज एक फोटा टाकणार 

अजित पवारांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी गुंडांची रांग लागली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत. आज मी एक फोटो टाकलाय,तसा मी रोज टाकणार आहे असा इशाराही राऊत यांनी दिला. 

पंतप्रधानांवर साधला निशाणा

 पोलिस स्टेशनमध्ये त्यांचे आमदार गोळीबार करत आहेत, या सगळ्या विषयांवर पंतप्रधान मोदी काही बोलले का ? त्यावर त्यांचं मौन का ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. देशातील समस्यांवर मोदी काहीच बोलले नाही. तासाभराच्या भाषणात निम्मा वेळ तर मोदी फक्त काँग्रेसवर टीका करत होते. नेहरू, इंदिरा गांधीवर टीका करत राहिले. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा असा सल्ला देत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि सरकारवर निशाणा साधला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!